Created on 13 Oct at 11:41 AM
" नंतर एकदा संध्याकाळच्या दोन ऑफ तासांना आमची आणि नववी 'ड'ची मॅच झाली तेव्हा फावड्यानं पाच विकेट्स काढल्या तर चित्र्यानं लागोपाठ तीन फोर मारल्या, तेव्हा ती सरळ त्यांच्याकडे आली. "काँग्रॅच्युलेशन्स, पवार." ती म्हणाली. "काय सोलिड विकेट्स काढल्यास तू. चित्रे तूसुद्धा मस्त खेळलास." चित्र्याला काय फरक पडला नाही. कारण त्याला बांद्र्याच्या पोरींची सवय होती. त्यानं नुसता केसावरून हात फिरवला आणि दिलं; पण फावड्याची मात्र विकेट गेली. "काय म्हणाली रे ती?" त्यानं मला नंतर विचारलं. "काँग्रेसचं अधिवेशन? त्याचा काय संबंध?" त्यावर आम्ही चिक्कार हसलो. तेव्हापासून कुणाचं अभिनंदन करायचं असलं तर आम्ही तेच म्हणू लगलो. काँग्रेसचं अधिवेशन. "
— Milind Bokil

More Quotes Like This